लोखंड, स्टील, सिमेंट खरेदी विक्रीची सर्व दुकाने उद्यापासून दररोज 4 वाजता बंद -बेळगाव शहर परिसरासह आसपासच्या ग्रामीण भागातील लोखंड, स्टील आणि सिमेंट खरेदी विक्रीची सर्व दुकाने उद्या सोमवार दि. 27 जुलै 2020 पासून दररोज सायंकाळी 4 वाजता बंद केली जाणार असल्याचे बेळगाव स्टील ट्रेडर्स असोसिएशन आणि सिमेंट डीलर्स असोसिएशन बेळगाव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
शहर परिसर आणि ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. तेंव्हा संभाव्य धोका टाळण्यासाठी शहर परिसरातील लोखंड, स्टील आणि सिमेंटची खरेदी-विक्री करणाऱ्या सर्व प्रमुख वितरकांनी टेलिफोनिक कॉन्फरन्सद्वारे उपरोक्त निर्णय घेतला आहे.
सर्वसामान्य जनतेसह लोखंड, स्टील व सिमेंट उद्योगाशी संबंधित ग्राहक, कर्मचारी आणि मजुरांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तेंव्हा संबंधित सर्व व्यापारी व वितरकांनी उद्या सोमवारपासून दररोज ठीक 4 वाजता आपले व्यवहार बंद करावेत.
तसेच संघटनेच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे बेळगाव स्टील ट्रेडर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन हंगीरगेकर आणि सिमेंट डीलर्स असोसिएशनचे सेक्रेटरी संजय बेळगांवकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
What with mobile shops
काय साहेब हे फक्त नावापुरते आहे कोणीच पालन करत नाही