बेळगावच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीने गुजरातला साखर पोचवण्यासाठी घेतलेले पन्नास हजार रुपये भाडे आणि पंचवीस टन साखर हडप करून दुसऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीला टोपी घातल्याची घटना घडली आहे.
एक आठवड्यापूर्वी कारवरच्या साखर कारखान्यातून 25 टन साखर 50 हजार रुपये भाडे देऊन अहमदाबादच्या हिमालय कंपनीला पोचवण्याचे कंत्राट बेळगावच्या राजकमल ट्रान्सपोर्ट कंपनीला देण्यात आले होते.
या कंपनीने हे भाडे बेळगावच्या किसमत ट्रान्सपोर्ट कंपनीला दिले होते.पण ही साखर अहमदाबादला पोचालीच नाही.
या बाबत राजकमल ट्रान्स्पोर्टचे प्रशांत गंगणनवर यांनी किस्मत ट्रान्स्पोर्टचे एजंट हिजयातुल्ला मोईन आणि गुजरातचे अमारीनंदर ताजा आणि घनश्याम गोरख यांच्या विरोधात माळ मारुती पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.