पुढील निवडणुकीत काँग्रेस पक्षच नक्की सत्तेवर येणार आहे असे उदगार केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी काढले.
सरचिटणीस पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर त्यांनी प्रथमच चिकोडीला भेट दिली.यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाके फोडून जल्लोशी स्वागत केले.
पूर्वीचा काँग्रेस पक्ष वेगळा,आजचा काँग्रेस पक्ष वेगळा.डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जण पक्ष संघटना मजबूत करणार आहोत.
शिवाकुमार यांचे कार्य पाहून त्यांच्यावर पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे.सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन पक्ष मजबूत करण्यासाठी कार्य करत आहेत असेही सतीश जारकीहोळी म्हणाले.