अलीकडच्या काळात मोठमोठ्या शहरांमधील घरे, दुकाने, हॉटेल्स, बेकरी, रेस्टॉरंट, मॉल्स आदी ठिकाणी ऊन-पावसापासून संरक्षण देणारे विविध रंगांचे फोल्डेबल ऑनिंग आणि कॅनोपी सर्वांचे लक्ष आकर्षून घेत असतात. या फोल्डेबल ऑनिंग आणि कॅनोपीचे बेळगावात देखील उत्पादन केले जाते. युवा उद्योजक ज्योतिबा कृष्णा हुंदरे यांच्या मालकीची “सह्याद्री सिस्टिम्स” ही एकमेव कंपनी बेळगावात ऑनिंग आणि कॅनोपीचे उत्पादन करते.
मूळचे मच्छे गावाचे रहिवासी असणाऱ्या ज्योतिबा कृष्णा हुंदरे यांना उद्योग-धंद्यात काहीतरी नवे करण्याचा ध्यास होता. या ध्यासातून 10 वर्षापूर्वी 2009 साली त्यांनी सह्याद्री सिस्टिम्स कंपनी स्थापन करून फोल्डेबल ऑनिंग आणि कॅनोपीचे उत्पादन सुरू केले. तेंव्हा ऑनिंग आणि कॅनोपी हा प्रकार बेळगावात तसा नवा होता.
त्यामुळे प्रारंभीच्या काळात तितकीशी मागणी नसल्यामुळे ज्योतिबा हुंदरे यांना आपल्या उत्पादनाचा खप वाढावा यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले. त्यांच्या या परिश्रमामुळे अल्पावधीत सह्याद्री सिस्टिम्सचे फोल्डेबल ऑनिंग आणि कॅनोपी लोकप्रिय होऊ लागले. विश्वासार्ह, टिकाऊ व अत्यंत लक्षवेधी फोल्डेबल ऑनिंग आणि कॅनोपीचे उत्पादन करणारी सह्याद्री सिस्टिम्स ही बेळगावातील एकमेव कंपनी असून शहरात तिच्या दोन युनिट्स आहेत. याव्यतिरिक्त गोव्यामध्ये या कंपनीची एक शाखा आहे.
बेळगावातील दोन युनिटपैकी एक युनिट उद्यमबाग येथील जीआयटी महाविद्यालयासमोर आणि आणि दुसरे भाग्यनगर 9 वा क्राॅस येथे आहे. भाग्यनगर येथील युनिटमध्ये फेब्रिकेशनचे काम केले जाते. या ठिकाणी उत्पादनावर अखेरचा हात फिरवला जातो आणि त्यानंतर ते बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. सह्याद्री सिस्टिम्स कंपनीमध्ये नवी संकल्पना आणि डिझाईननुसार बंगल्यांच्या खुल्या जागेसाठी आकर्षक फोल्डेबल छत अर्थात कॅनोपी, टेरेस, बाल्कनी व खिडक्यांसाठी लक्षवेधी फोल्डेबल ऑनिंग्स अर्थात शेड्स तसेच हॉटेल्स, दुकाने, अपार्टमेंट, मॉल्स आदींच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी कॅनोपी आणि पाथवाॅकवेज व स्टेअर वाॅकवेज तयार करून दिले जातात. ही सर्व उत्पादने तयार करण्यासाठी कार्पोरेट क्षेत्रातील मोठ्या नामवंत कंपन्यांकडून दर्जेदार फॅब्रिक आणि अन्य साहित्य मागविले जाते हे विशेष होय.
![Sahyadri systems](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/07/IMG-20200722-WA0258.jpg)
सह्याद्री सिस्टिम ही कंपनी 2009 सालापासून सर्व प्रकारची इंटिरियर आणि एक्स्टिरियर सोलार आणि वेदर प्रोटेक्शन उत्पादने तयार करणारी बेळगावातील आद्य प्रणेती कंपनी आहे. सध्या बहुसंख्य घरे, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि कार्यालयांमध्ये सह्याद्री सिस्टीम्सची उत्पादने वापरली जातात. त्याप्रमाणे गेल्या दशकभरापासून आर्किटेक्ट आणि डिझायनर घरे, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, मॉल्स आणि कार्यालयांमध्ये “सह्याद्री”चीच उत्पादने वापरण्याचा सल्ला देत असतात. दर्जेदार टिकाऊ उत्पादन आणि तत्पर सेवेच्या जोरावर सह्याद्री सिस्टिम्सने गेल्या दहा वर्षात जवळपास 9,000 ग्राहकांचे समाधान केले आहे.
यासंदर्भात बोलताना ज्योतिबा हुंदरे यांनी प्रथम आपल्या सह्याद्री सिस्टिम्स कंपनीबाबत माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी आज-काल घरे, दुकाने, हॉटेल्स, बेकरी, रेस्टॉरंट, मॉल्स आदींच्या दर्शनीय भागावर पत्रे घालणे बंद झाले आहे. सध्याच्या आधुनिक युगात पत्रे घातल्यामुळे संबंधित वास्तूचे सौंदर्य बिघडते हे लक्षात आल्यामुळे लोक फोल्डेबल ऑनिंग आणि कॅनोपी पसंत करू लागले आहेत. विभिन्न आकर्षक रंगांच्या फोल्डेबल ऑनिंग आणि कॅनोपीमुळे घरे, दुकाने, हॉटेल्स, बेकरी, रेस्टॉरंट आदींच्या दर्शनीय भागाचे सौंदर्यही खुलते आणि ऊन-पावसापासून संरक्षण व निवाराही मिळतो.
![Jyotiba hundre](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/07/IMG-20200722-WA0242.jpg)
विशेष म्हणजे हे ऑनिंग आणि कॅनोपी फोल्डेबल अर्थात दुमडता येत असल्यामुळे ते आत-बाहेर करता येतात हा त्यांचा फायदा आहे. ऑनिंग आणि कॅनोपी तयार करण्यासाठी पीव्हीसी कॉटेड इम्पोर्टेड फॅब्रिक वापरले जाते. त्यामुळे कडक ऊन अथवा सततच्या पावसामुळे ते खराब होत नाही. गेल्या दहा वर्षात आम्ही बेळगाव आणि गोव्यामधील एकूण 3519 ग्राहकांचे समाधान केले असल्याचे सांगून दिवसेंदिवस सह्याद्रीची उत्पादने अधिकाधिक लोकप्रिय होत असल्याची माहितीही ज्योतिबा हुंदरे यांनी दिली.