टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवरील अरुण थिएटरसमोर रेल्वेमार्ग शेजारी असलेला जुनाट धोकादायक वृक्ष त्वरित तोडण्यात यावा, अशी मागणी आज सोमवारी सकाळी बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले होती.
त्याची तात्काळ दखल घेऊन वनखात्याने सायंकाळी हा वृक्ष हटविला. टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवरील अरुण थिएटर व एसबीआय बँकेसमोर रेल्वेमार्गाशेजारील जुनाट झालेला एक वृक्ष कोसळण्याच्या स्थितीत होता.
यासंदर्भात आवाज उठवून फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर यांनी बेळगाव लाईव्हला याबाबत माहिती दिली. बेळगाव लाईव्हने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध करताच त्याची तात्काळ दखल घेऊन वनखात्यासह रेल्वे पोलिसांनी काँग्रेस रोड येथील तो धोकादायक वृक्ष सोमवारी सायंकाळी हटवला.
या प्रसंगी वनखात्याचे डीवायआरएफओ विनय एस. गौडर, मंजुनाथ शिंगीहळ्ळी, रेल्वे पोलीस रमेश बिरादार, अप्पाजी नरसिंगनावर, सिद्धय्या हिरेमठ आदी उपस्थित होते.