जिल्ह्यात लॉक डाऊन जारी करा : राजीव गांधी ब्रिगेडची मागणी-कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे कम्युनिटी स्प्रेड अर्थात सामूहिक संसर्गात रूपांतर होऊ नये यासाठी जिल्ह्यात तात्काळ खबरदारीचा लॉक डाऊन जारी करावा, अशी मागणी कर्नाटक प्रदेश राजीव गांधी ब्रिगेडच्या बेळगाव शहर शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
कर्नाटक प्रदेश राजीव गांधी ब्रिगेडच्या बेळगाव शहर शाखेतर्फे अध्यक्ष शकील मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने त्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार केला. बेळगाव जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता वाढत आहे. कोरोना प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी सध्या लस देखील उपलब्ध नाही. तेंव्हा तात्काळ किमान 14 दिवसांचा लॉक डाऊन लागू करणे फायद्याचे ठरणार आहे. पहिल्या लाॅक डाऊनच्या काळात पोलीस खाते आणि जिल्हा प्रशासनाने अत्यंत उत्तमपणे परिस्थिती हाताळली होती. जनतेने देखील त्यांना चांगले सहकार्य केले होते. आता पावसाळ्याला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन वेगाने होण्याची शक्यता आहे. तेंव्हा कृपया जनहितार्थ बेळगाव जिल्ह्यात तात्काळ लॉक डाऊन घोषित करावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी राजीव गांधी ब्रिगेडचे शहराध्यक्ष मुल्ला यांच्यासह सरचिटणीस इम्तियाज जमादार, बेळगाव उत्तरचे अध्यक्ष शेखर इतवारी चाबारी व दक्षिणचे अध्यक्ष अहमद रश्मी उपस्थित होते.