गतवर्षी अतिपावसाने तर यंदा लॉकडाउअन मुळे पिकाला योग्य भाव नाही या सर्वामुळे नुकसानदारी कर्जबाजारी झालेल्या बिजगरनी शेतकऱ्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ३ जुलै ) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली . मृत शेतकऱ्याचे नाव महेंद्र जयवंत जाधव (३६) असे आहे.
बिजगर्णीत मयत शेतकऱ्याची कमी जमीन असुन त्यांना दोन मुले आहेत त्यांच्या कुटुबांची परिस्थिती अंत्यत नाजुक असुन शेती व मोलमजुरी करुन आपल्या कुटुबांचा उदरनिर्वाह करतात. गेल्या दोन वर्षापासुन परिसरात पडलेला दुष्काळ, यंदा कोरोना च्या पाश्वर्भूमीवर देशभरात लॉकडाउनमुळे शेतीतील बटाटा पिक पुर्ण वाया गेल्याने शेतीसाठी लागलेला खर्च देखील निघाला नाही त्यातच पतसंस्था सोसायटी, नातेवाईक, मित्रमंडळीकडुन घेतलेले लाखो रुपये, यासर्वाचे संस्थेचे कर्ज कुटुबाचा उदरनिर्वाह करायचा का कर्ज फेडायचे या चितेंने महेंद्र गेल्या चार महिण्यापासुन चितांग्रस्त होता. घरातील मंडळी सर्व झोपी गेली असता मागील खोलीत रात्री राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
त्यामुळे त्यांच्या घरच्यावर दुखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यामुळे सरकारने त्याना आर्थिक सहाय करून सहकार्य करण्याची गरज आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.तालुक्यात दिवसेंदिवस आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढतच आहे.