कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या नव्या एसओपीनुसार आता कर्नाटकात येणाऱ्या महाराष्ट्रसह देशातील अन्य सर्व राज्यातील व्यक्तींना सक्तीने 14 दिवस होम काॅरंटाईन व्हावे लागणार आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने आपल्या स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये (एसओपी) सुधारणा केली आहे. या नव्या सुधारणेनुसार आता कर्नाटकात येणाऱ्या महाराष्ट्रसह देशातील अन्य सर्व राज्यातील व्यक्तींना सक्तीने 14 दिवस होम काॅरंटाईन व्हावे लागणार आहे. राज्याच्या कार्यकारी समितीची सदस्य व महसूल विभाग आपत्ती व्यवस्थापन मुख्य सचिव यांना एन. मंजुनाथ प्रसाद यांनी हा आदेश काढला आहे. देशातील अनलॉक -2 च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कंटेनमेंट अजून बाहेरील बहुतांश दैनंदिन जीवनक्रम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तथापि तरी कंटेनमेंट झोनमधील लाॅक डाऊनचा कालावधी राज्य सरकारने 30 जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार 31 जुलै 2020 पर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते कोरोना विषाणू प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात घेऊन वेळोवेळी आपल्या स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अर्थात एसओपीमध्ये बदल करत असते. त्या अनुषंगाने आरोग्य खात्यातर्फे 26 जून 2020 रोजी जारी करण्यात आलेल्या एसओपीमध्ये सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार महाराष्ट्रासह देशातील अन्य कोणत्याही राज्यातून कर्नाटकात येणाऱ्या व्यक्तीला सक्तीने 14 दिवसांचे होम काॅरंटाईन व्हावे लागणार आहे.
एसओपीसह काॅरंटाईनची प्रक्रिया आणि नियम पुढील आदेश येईपर्यंत पूर्वीप्रमाणेच असणार आहेत, असे राज्याच्या कार्यकारी समितीची सदस्य व महसूल विभागचे आपत्ती व्यवस्थान मुख्य सचिव एन. मंजुनाथ प्रसाद यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.