जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणूवरील लस निर्मितीची प्रक्रिया आपल्या देशात सुरू झाली आहे. भारताने या लसीचा शोध लावावा आणि करोडो लोकांना त्याचा लाभ होऊन त्यांचे प्राण वाचावेत या उदात्त हेतूने ताशिलदार गल्ली बेळगावचा धडाडीचा युवा स्वयंसेवक गौरांग गेंजी याने कोव्हॅक्सीनच्या मानवी चांचणीसाठी आपले नांव नोंदवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या पद्धतीने मानवी चांचणीसाठी नांव नोंदवणारा तो बेळगांवचा पहिला स्वयंसेवक असल्याचे सांगितले जाते.
कोरोनावरील उपचारासाठी पूरक ठरणाऱ्या कोव्हॅक्सीनच्या मानवी चांचणीला लवकरच बेळगावात प्रारंभ होत आहे. शहरातील डॉ. आंबेडकर रोडवरील जीवनरेखा हॉस्पिटलला कोव्हॅक्सीन लसीची मानवी चांचणी करण्याची परवानगी मिळाली आहे. या चांचणीसाठी 18 ते 55 वयोगटातील 150 सुदृढ स्वयंसेवक निवडले जाणार असून नांव नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे. मात्र या आवाहना पूर्वीच गौरांग गेंजी याने संपूर्ण मानवतेच्या हितासाठी स्वयंस्फुर्तीने कोव्हॅक्सीनच्या चांचणीसाठी आपले नांव नोंदविले आहे. काल मंगळवारी रक्त तपासणीसाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. गौरांगचा अलीकडेच महिनाभरापूर्वी विवाह झाला आहे.
शहरातील विविध सामाजिक उपक्रमात आघाडीवर असणारा गौरांग जगन्नाथ गेंजी हा छ. शिवाजी महाराज यांचा निस्सीम भक्त आहे. शिवरायांबद्दलची आपली भक्ती व प्रेम व्यक्त करताना त्याने ताशिलदार गल्ली येथील आपल्या घराच्या इमारतीवर जमिनीपासून 100 फूट उंचावर आगळ्या पद्धतीने छ. शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा स्थापन केला आहे. गौरांगने श्रीराम सेना हिंदुस्तानच्या सहकार्याने रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या अनेक गो -मातांना जीवदान दिले आहे. प्रेरणादायी वक्ता असणाऱ्या गौरांगने 36 हून अधिक मुलींची धर्मांतरामधून (जिहाद) सुटका केली आहे. त्याचप्रमाणे अनेक कॉलेज युवकांना ड्रग व गांजा यासारख्या व्यसनांपासून परावृत्त केले आहे. हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्र या विषयावर प्रभुत्व असणारा गौरांग गेंजी हा एक उत्तम वक्ता आहे.
शहरात विविध ठिकाणी राबविल्या जाणाऱ्या रोगप्रतिकारक औषधी गोळ्या अथवा प्रतिजैविक औषधे गोळ्यांच्या वाटप उपक्रमात त्याचा नेहमी मी सक्रिय सहभाग असतो. केंद्र सरकारने जेंव्हा वादग्रस्त कायदा हटवून काश्मीरला भारताशी संलग्न केले तेंव्हा त्या आनंदाप्रीत्यर्थ गौरांगने धर्मवीर संभाजी चौकात मिठाईचे वाटप केले होते. गेल्या मे महिन्यातील लॉक डाऊनच्या काळात त्याने सुमारे 500 गरीब गरजू लोकांना मोफत अन्न वाटप केले. त्याचप्रमाणे त्यांच्या पुढाकाराने गेल्या फेब्रुवारी महिन्यात येळ्ळूर गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आणि गेल्या 11 जुलै रोजी त्या ठिकाणी वृक्षारोपण देखील करण्यात आले. तसेच युवासेना बेळगावच्या सहकार्याने त्याने नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कपलेश्वर मंदिर येथे नागरिकांना 1 हजार मास्कचे वाटप केले.
गौरांग गेंजी हा एक उत्कृष्ट शरीरसौष्ठवपटू देखील आहे. त्याने आता पर्यंत 46 सुवर्णपदके मिळवली आहेत. मि. कर्नाटक शरीरसौष्ठव स्पर्धेत “बेस्ट पोझर” हा किताब मिळवणाऱ्या वेट लिफ्टिंग आणि जलतरणात सुवर्णपदक मिळविले आहे. सध्या तो पिस्तूल शूटिंग अर्थात नेमबाजीचा सराव करत आहे.
I am also raddy for test. If possible.
My help
Super bro
Congratulations Gourang. May God give you a great success