Friday, April 26, 2024

/

कोव्हीड सेंटर्समध्ये हे ७६८ बेड्स तयार-

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात लॉक डाऊन लागू करण्यासंदर्भात येत्या सोमवारी जिल्हापालक मंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती ती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज शनिवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी कोरोना चा प्रादुर्भाव नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. यापुढे कोरोनाबाधित डॉक्टर्स आणि नर्स आदी वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र विभागात उपचार केले जातील. सध्या प्रत्येक तालुक्यात 30 ऑक्सिजन बेड्स तयार ठेवण्यात आले आहे. पीएसआय आणि प्रभाकर कोरे के एल ई हॉस्पिटलमध्ये हे कोरोना वर उपचार केले जात आहेत असे सांगून यासाठी ईएसआय हॉस्पिटलमध्ये 25 आणि केएलई हॉस्पिटलमध्ये 65 बेड्स तयार ठेवण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी त्यांना या दोन्ही रुग्णालयांमध्ये आणखी प्रत्येकी 30 बेड्स वाढविण्याची विनंती केली.

बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फक्त गंभीर अवस्थेतील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातील. उर्वरित कोरोनाबाधित रुग्णांवर संबंधित अन्य हॉस्पिटल्समध्ये उपचार केले जातील. कोरोनाग्रस्त रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन सरकारीच नव्हे तर सर्व लहान-मोठ्या खाजगी हॉस्पिटल्सना कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी स्पष्ट केले.

 belgaum

जिल्ह्यातील कोव्हीड सेंटर्समध्ये हे ७६८ बेड्स तयार ठेवण्यात आले आहेत. हालभावी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेतील उपचार केंद्रांमध्ये असणाऱ्या बेड्सची संख्या वाढविण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्रयोगशाळांना 36,817 स्बॅचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 2856 नमुन्यांचा अहवाल हाती येणे बाकी आहे. त्याचप्रमाणे 1782 नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यासाठी तयार ठेवण्यात आले असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.

कोरोना संसर्गाची वाढती तीव्रता आणि पर्यायाने रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात लॉक डाऊन जारी करावे, अशी मागणी विविध संघटना आणि जनतेकडून केली जात आहे. तेंव्हा या संदर्भात येत्या सोमवारी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.