टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवरील अरुण थिएटरसमोर रेल्वेमार्ग शेजारी असलेला जुनाट धोकादायक वृक्ष त्वरित सोडण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवरील अरुण थिएटर व एसबीआय बँकेसमोर रेल्वेमार्गाशेजारी असलेला एक वृक्ष जुनाट झाला असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. काँग्रेस रोडवरून एखादे अवजड वाहन जरी गेल्यास रेल्वेमार्गावर कललेला हा वृक्ष सध्या मुळापासून हादरत अर्थात हलतं आहे.
सध्याचे पावसाळी वातावरण आणि जोरदार हवा लक्षात घेता सदर वक्ष कोणत्याही क्षणी उन्मळून रेल्वेमार्गावर कोसळू शकतो. एखादी रेल्वे येत असताना हा वृक्ष जर रेल्वेमार्गावर कोसळला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
तेंव्हा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित खात्याने याकडे तात्काळ लक्ष देऊन हा वृक्ष तोडावा, अशी काँग्रेस रोड मार्गावरून ये-जा करणाऱ्या जागरूक नागरिकांची मागणी आहे.