कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे पण त्यातच दिलासादायक गोष्ट म्हणजे दोन ते तीन दिवसांपासून बेळगाव व बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार मंदावला आहे अश्या परिस्थितीत कोरोना जर पुर्णपणे घालवायचा असेल तर लॉक डाऊन करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील अथणी निपाणी गोकाक आणि चिकोडी मुडलगी या तालुक्यांनी स्वयं घोषित लॉक डाउन घोषित करून सामाजिक समज दाखवून दिली आहे.दहा ते पंधरा दिवसाचा पूर्ण लॉक डाऊन सहन केला तर कोरोनाची भीती कमी होणार असेल तर नागरिकांनीच पूर्ण लॉक डाऊनची मागणी का करू नये? असं जाणकारांचे मत आहे.मुंबई धारावी परिसरांने एक पॅटर्न राबवून कोरोनावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवले आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने(who) धारावीचे विशेष कौतुक केलं आहे.कुचमत आणि आर्थिक तंगीत जगण्यापेक्षा कोरोनाशी दोन हात करून त्याला हद्दपार करण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्याचा अर्थ कारणांचा गाडा जो रुतला आहे तो मार्गस्थ करायचा असेल तर नागरिकांनीच सूत्रे हातात घेण्याची गरज निर्माण झाली आहे.दहा ते पंधरा दिवस आपण सहन शक्ती पणाला लावली तर आपलं जनजीवन सुरळीत येण्यास मदत होईल यासाठी नागरिकांनी तत्पर व्हावं लागेल.
सोमवारी दुपारी नंतर बंगळुरू मध्ये मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा बेळगाव जिल्ह्यात लॉक डाऊन करावं की नाही याबाबत निर्णय घेणार आहेत.एकीकडे जिल्ह्यातील पाच तालुक्यानी लॉक डाउन करण्याचा निर्णय घेतला असताना उर्वरित तालुक्यां बाबत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेळगाव शहर आणि तालुक्याला महाराष्ट्र आणि गोव्याची सीमा जवळ आहे बाजूच्या चंदगड तालुक्यात देखील रुग्ण वाढत आहेत महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांचे ये जा कमी होताना दिसत नाही अश्या वेळी जुलै महिन्यात लॉक डाऊन केल्यास नक्कीच कोरोनावर नियंत्रण येईल असेही जाणकारांचे म्हणणे आहे.
कोरोना बाधित होऊन इस्पितळात उपचार घेण्यापेक्षा घरात राहून कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न करणे जास्त इष्ट ठरेल.