कुमारस्वामी लेआउट येथील यापूर्वी काॅरंटाईन सेंटर असणाऱ्या सरकारी मागासवर्गीय समुदायाच्या (बीसीएच) वसतिगृहाचे आता 124 बेड्सच्या कोवीड केअर सेंटर अर्थात कोरोना उपचार केंद्रात रुपांतर झाले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर कोरोना उपचार केंद्रामध्ये आत्तापर्यंत 19 कोरोनाग्रस्त रुग्णांना हलविण्यात आले असल्यामुळे कुमारस्वामी लेआउट येथील नागरिक भीती व्यक्त केली जात आहे सदर उपचार केंद्रात पाच उत्तम प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये सर्व ती खबरदारी घेऊन आपले कर्तव्य बजावत आहेत, तरी देखील स्थानिकांमध्ये भीती पसरली आहे. परंतु अद्याप कोणीही जाहीर तक्रार करण्यास पुढे सरसावले नाही.
सदर बीसीएच कोरोना उपचार केंद्रातील प्रशस्त खोल्यांपैकी प्रत्येक खोलीत दोन रुग्णांची सोय होऊ शकत असल्यामुळे जास्तीत जास्त 114 रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जाऊ शकतात. याठिकाणी उपचारासाठी दाखल केले जाणारे सर्व रुग्ण असिम्प्टोमेटिक असणार आहेत.
कुमार स्वामी लेआऊट येथील नागरिकांनी गेल्या मे महिन्यामध्ये बीसीएच वस्तीगृहात सुरू करण्यात आलेल्या काॅरंटाईन सेंटर विरुद्ध आवाज उठवून ते अन्यत्र हलविण्याची मागणी केली होती. त्यानंतर या काॅरंटाईन सेंटरमधील रुग्ण खुलेआम बाहेर फिरत होते. कारण या रुग्णांपैकी काहींची केंद्रातील सुरक्षारक्षकांची चांगली मैत्री झाली होती असा स्थानिकांचा आरोप होता.
परंतु काॅरंटाईन सेंटरच्या सुरक्षारक्षकांनी या आरोपाचा इन्कार केला होता. आता तर या काॅरंटाईन सेंटरचे कोरोना रुग्णांवरील उपचार केंद्रात रूपांतर झाले आहे. तेंव्हा पूर्वीसारखे रुग्ण खुलेआम रस्त्यावर फिरू लागले तर काय करायचे? या शंकेने स्थानिक नागरिक पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, बीसीएच कोवीड केअर सेंटरमध्ये आणि सेंटरच्या बाहेर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आले आहेत. तेंव्हा नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता निर्धास्त राहावे, असे प्रशासन आणि आरोग्य खात्याकडून कळविण्यात आले आहे.