ए पी एम सी मधील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये पुन्हा सुरक्षित अंतर यांचा फज्जा उडाला आहे. त्या दृष्टीकोनातून आता एपीएमसी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी एपीएमसी भाजी मार्केट पहाटे पाच ते दुपारी एक पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले असले तरी व्यापाऱ्यांनी व किरकोळ खरेदी विक्री धारकानी एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे.
त्या दृष्टिकोनातून आता या ठिकाणी देखील दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना महामारीमुळे बेळगाव जिल्ह्यात अनेक जण दगावले आहेत. जवळपास 60 हून अधिक जण या महामारीचे बळी पडले आहेत.
मात्र याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आपणच आपली सुरक्षा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. मात्र याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्यास नागरिक पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे काळजी घेऊनच सर्व व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र एपीएमसी येथील भाजी मार्केटमध्ये सुरक्षित अंतराचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याबाबत एपीएमसी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सुरक्षित अंतर ठेवूनच सर्व व्यवहार करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.