शनिवारी बेळगावात कोरोनाचे आणखी दोन बळी

0
 belgaum

राज्यात व बेळगावात पुन्हा एकदा कोरोनाने कहर घालण्यास सुरुवात केली असून शनिवारी राज्यात रेकॉर्ड ब्रेक असे 1839 नवीन रुग्ण सापडल्या नंतर तब्बल दोन बळी देखील गेले आहेत त्यामुळे कोरोना मुळे मृत झालेल्यांची संख्या 6 वर पोहोचली आहे.

दुपारी रायबाग कुडची येथील 70 वर्षीय व्यक्ती दगावल्या नंतर रात्री 9 वाजता वीरभद्र नगर बे येथील 48 वर्षीय इसमाचा देखील मृत्यू झाला आहे. बेळगाव शहरात कोरोनाचा दुसरा तर जिल्ह्यात सहा बळी गेले आहेत.Corona

bg

दोन्ही मयत हे श्वास घेण्यास त्रास होत आहेत म्हणून बिम्स इस्पितळात उपचारासाठी दाखल झाले होते एकाचे दुपारी तर दुसऱ्याचे रात्री निधन झाले आहे.

या अगोदर कोरोना मुळे दगावलेली संख्या कमी होती मात्र आता हळूहळू ही संख्या वाढत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जनतेने आरोग्य खात्याने घालून दिलेले नियम पाळणे गरजेचे आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.