Friday, April 26, 2024

/

येळ्ळूर रोडवरील “या” धोकादायक नाल्याकडे कोणी लक्ष देईल का?

 belgaum

अतिवृष्टी सुरू होण्याआधी येळ्ळूर रोड वडगांव येथील धोकादायक नाल्याचे युद्धपातळीवर बांधकाम करावे किंवा याठिकाणी तात्काळ मोठे पाईप घालावेत, अशी जोरदार मागणी अन्नपुर्नेश्वरीनगर 6 वा क्रॉस येथील नागरिकांनी केली आहे.

येळ्ळूर रोड वडगांव येथील नाला गेल्या अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे अडीच वर्षांपूर्वी या नाल्याला अधिकृत मान्यता देऊन सर्व्हे करण्यात आला होता तसेच नाल्याचे बांधकाम करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तथापि अद्यापपर्यंत या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. पावसाळ्यात अनगोळ, हिंदवाडी व भाग्यनगर येथील सांडपाण्यासह पावसाचे पाणी यांना देण्यात येत असते. यात भर म्हणजे या नाल्यावर रस्त्याच्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइप घालण्यात आले आहेत ते कांही ठिकाणी लहान आहेत. परिणामी पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्यामुळे हा नाला तुडुंब भरून या भागात पूर परिस्थिती निर्माण होते असते. नाल्याचे पाणी आसपासच्या घराघरांमध्ये पाणी शिरते. अन्नपुर्नेश्वरीनगर 6 वा क्रॉस हा रस्ता तर पूर्ण पाण्याखाली जात असतो. याठिकाणी गुडघाभर पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना ये – जा करणे कठीण होत असते. याठिकाणी रस्त्यावर इतके पाणी येते की एखाद्याच्या विशेष करून लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.

Vadgaon drainage
Vadgaon drainage

पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेकडून जेसीबी लावून या नाल्याची साफसफाई केली जाते. मात्र त्यानंतर या नाल्याकडे कोणी फिरकतही नाही. शिवाय नाल्यातून काढण्यात आलेल्या केरकचरा व गाळाची वेळीच उचलना करता तो काठावर रस्त्याशेजारी टाकण्यात येतो. पावसाळ्यात तुंबलेला नाला आणि संबंधित गाळ केरकचरा यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरण्याबरोबर डासांचा प्रादुर्भाव वाढत असतो. काल शहर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सदर नाल्यातील पाणी वाढले असून ते रस्त्यावर येऊ लागले आहे. पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा मागील वर्षाप्रमाणे याठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे.

 belgaum

तेंव्हा संभाव्य पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच अतिवृष्टीला प्रारंभ होण्यापूर्वी युद्धपातळीवर या नाल्याचे बांधकाम करावे अथवा या ठिकाणचे नाल्यातील पाण्यासाठी रस्त्याखाली घातलेले लहान पाईप बदलून मोठे पाईप घालावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे ही मागणी मान्य न झाल्यास पुढील वेळी महापालिकेचा टॅक्स न भरण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.