थैराटॉक्सिक पेरियोडिक पॅरालिसिस व्याधीने त्रस्त असलेल्या 36 वर्षाच्या युवकावर के एल ई सेंटीनरी हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करून रुगणाला बरे केले आहे.डॉ श्रीकांत मेत्री या डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करून त्याला बरे केले आहे.
या व्याधीमध्ये शरीरातील थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती अधिक प्रमाणावर तयार होऊन रुग्णाच्या शरीरात विष निर्माण होते.यामध्ये रुग्णाला श्वास घेणे,गिळण्यास त्रास होणे,स्नायू दुखणे ,छातीत दुखणे असा त्रास होतो.एक लाख व्यक्तींमध्ये असा एक रुग्ण आढळतो.रुग्णाची तपासणी करून योग्य निदान केल्यामुळे उपचाराने रुग्ण बरा झाला असे डॉ श्रीकांत मेत्री यांनी सांगितले.
अशा तऱ्हेच्या रुग्णावर योग्य उपचार झाले तर तो रुग्ण बरा होतो.के एल इ सेंटनरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी योग्य उपचार केल्यामुळे रुग्ण बरा झाला आहे.त्याबद्दल डॉक्टरांचे अभिनंदन करतो असे हॉस्पिटलचे निर्देशांक डॉ एस सी धारवाड यांनी सांगितले.डॉ एच बी राजशेखर यांनीही डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे.