नूतन पोलीस आयुक्त डॉ के त्यागराजन यांनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकार करताच बेळगावात त्यागराजन यांचा कार्यरंभ सुरू झाला आहे.
रविवारी रात्रीचं डॉ त्यागराजन हे बेळगावात दाखल झाले होते त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी मावळते पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांच्या कडून पदभार ग्रहण केला.
मावळते पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांची बदली सी आय डी बंगळुरू डी आय जी म्हणून झाली आहे तर त्याग राजन हे बंगळुरू हुन बेळगावला आले आहेत.त्यागराजन हे 2006 बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत.
पोलीस आयुक्तां सोबत शहरातील अनेक पोलीस निरीक्षक आणि ए सी पी यांच्या बदल्या होणार आहेत त्यामुळे बेळगावात आगामी दिवसांत पोलीस दलात बरेच नवीन चेहरे दिसणार आहेत.