बेळगाव तालुक्या जवळील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून संधी धबधब्याकडे पाहिले जाते. मात्र चंदगड तालुक्यात हा धबधबा येत असल्याने हा धबधबा पहायला यायचा असल्यास अनेक अटी घालण्यात आल्या असल्या तरी निश्चित काळासाठी हा धबधबा बंद असणार आहे. त्यामुळे पर्यटकांना नियमांचे पालन करूनच धबधबा पाहण्यासाठी नियमांचे पालन करत असाल तरी काही काळासाठी हा हा धबधबा पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय चंदगड तालुक्यातील नागरिक व वन तसेच पोलिस खात्याने घेतला आहे.
चंदगड तालुक्यातील सर्व मान्सून पिकनिक पॉईंट काही काळासाठी बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे तर सुंडी धबधब्यासाठी हि काही दिवस बंद ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्या दृष्टिकोनातून आता पर्यटकांनी नियमावलीचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. चंदगड तालुक्यातील सर्व मान्सून पिकनिक पॉईंट अनिश्चित काळासाठी बंद केले आहेत.
सुंडी, फाटकवाडी, स्वप्न वेल धबधबा सहीत अनेक धबधब्याचा समावेश आहे. नुकताच चंदगड येथे झालेल्या महसूल, पोलीस, वन व स्थानिक ग्रामस्थांच्या बैठकीत एकमुखी निर्णय घेण्यात आला. चंदगड परिसरात अनेक गावांत कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर कोणतेही नियंत्रण राहू शकणार नाही. त्यामुळे तालुक्यातील धबधबे, धरणे, अभयारण्य अनिश्चित काळासाठी बंद ठेवणेत आली आहेत. तसेच नियम मोडून कुणी या ठिकाणी आढळून आलेस त्यांच्यावर पोलीस व वन खात्यातर्फे संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.
8त्यामुळे यावर्षी पर्यटकांनी कोणत्याही धबधबा अथवा पिकनिक पॉइंट कडे जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे याबाबत आता गांभीर्याने विचार करून पर्यटकांनी आपला मोह आवरावा अशी विनंती करण्यात आली आहे