कोरोना मुळे तब्बल तीन महिने दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून दहावी परीक्षेकडे पाहिले जाते. गुरुवार दिनांक 25 जून पासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले असून जिल्हा प्रशासन ही योग्य ती खबरदारी घेतली आहे.
आज प्रथम विषयाचा पेपर असून तो देण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत. एकंदरीत पालकांचा दृष्टिकोन पाहता आणखी काही दिवस परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी होती. मात्र प्रशासनाने आणि शिक्षण खात्याने योग्य ती खबरदारी घेत अखेर परीक्षेला परवानगी दिली आहे. दहावीच्या परीक्षेतील पहिला पेपर आज होणार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी वर्गातून हुरहुर होत असले तरी विद्यार्थी मात्र परीक्षा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
याची प्राथमिक तपासणी करून घेण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 10 पासून परीक्षा सुरू होणार आता याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पहिला पेपर कसा जाणार विशेष करून कोरोना काळात पहिल्या पेपरसाठी कोणती खबरदारी प्रशासनाने घेतली आहे याकडेही पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. एकंदरीत हा सारा कारभार पाहता पहिला पेपर म्हणण्यापेक्षा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांची संरक्षण करावे अन्यथा कोरोनासारख्या महाभयंकर रोगाचा फैलाव वाढण्यास कोणीच रोखू शकणार नाही, असेही सांगण्यात येत आहे.
एकंदरीत हा सारा कठीण प्रसंग असून विद्यार्थी आपल्या भविष्यातील महत्त्वाच्या टप्प्याचा पहिला पेपर देत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी शिक्षण खाते आणि पालक वर्ग तसेच विद्यार्थी सज्ज झाले आहेत.