जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या जिल्ह्यात दौर्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे एपीएमसी असणार आहे. सोमवारी रमेश जारकीहोळी हे एपीएमसी येथे भेट देऊन विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहेत.
सोमवारी हा दौरा होणार असून सकाळी अकरा वाजता स्मार्ट सिटी योजने अंतर्गत येणाऱ्या विकासकामांचे माहिती जाणून घेण्यासाठी महानगरपालिकेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता एपीएमसी येथे भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे नुकतीच बिनविरोध निवड झालेल्या एपीएमसी चे अध्यक्ष युवराज कदम यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. याआधी रमेश जारकीहोळी काँग्रेसमध्ये असताना युवराज कदम यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. आता ते भाजपमध्ये गेले असले तरी त्यांचे संबंध चांगलेच आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. या जिल्ह्यात दौर्यात अनेक विकास कामांबरोबरच समस्याही जाणून घेणार आहेत.
एपीएमसीमध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या भाजी मार्केट संदर्भात ही त्यांची चर्चा होणार आहे. सोमवारी दुपारी एक नंतर पालक मंत्री रमेश जारकीहोळी हे एपीएमसीमध्ये दाखल होणार आहेत. येथील व्यापाऱ्यां बरोबरच सदस्यांची ही बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता पालकमंत्र्यांच्या दौरा हा महत्त्वाचा टप्पा बनून राहिला आहे. त्या दृष्टीकोनातून सोमवारी एपीएमसीमध्ये काय ठरणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.