कॅम्प येथील फिश मार्केट मॅजिक एका झाडाखाली उघड्यावर राहणाऱ्या एका गरजू गरीब गरजू कुटुंबाला फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे जीवनावश्यक साहित्य आणि उबदार कपड्यांसह टेन्ट अर्थात निवाऱ्यासाठी राहुटीचे मोफत वितरण करण्यात आले.
फिश मार्केट मॅजिक एका झाडाखाली एक कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. या कुटुंबाला फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे नुकतेच जीवनावश्यक साहित्याच्या किटसह एक काॅट, उबदार कपडे आणि टेन्ट अर्थात निवाऱ्यासाठी राहुटीचे मोफत वितरण करण्यात आले.
पावसाळ्यात सदर कुटुंबाची गैरसोय होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी फेसबुक फ्रेंड सर्कल चे प्रमुख संतोष दरेकर, शेरसिंग चौहान, शाबोद्दिन बॉम्बेवाले, मंदार कोल्हापुरे आदी उपस्थित होते. गेल्या चार महिन्यापासून फेसबुक फ्रेंड्स सर्कल संबंधित कुटुंबाला सर्वतोपरी सहाय्य करत आहे.