ऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेला गोंधळ लक्षात घेऊन आता राज्य सरकारने एका आदेशाद्वारे पहिली ते दहावीपर्यंत ऑनलाइन वर्ग सुरू करण्यास अनुमती दिली आहे.
ऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आता राज्य सरकारने याबाबत आदेश दिला असून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत ऑनलाइन वर्ग सुरू करण्याची सूचना दिली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक शिक्षण खात्याने यासंदर्भात शाळांसाठी मार्गदर्शक सूची जारी केली आहे.
या मार्गदर्शक सूचीनुसार इयत्ता पहिली ते पाचवीसाठी आठवड्यात तीन दिवस क्लास आणि सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील पाच दिवस क्लास, दररोज 30 ते 45 मिनिटे अभ्यास घ्यावा, आठवड्यातील एक दिवस पालकांची बैठक घेऊन चर्चा करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचीचे सर्व शाळांनी काटेकोरपणे पालन करण्याची सूचना सरकारने केली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षणाच्या नांवाखाली अतिरिक्त रक्कम वसूल केल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही शिक्षण खात्याने दिला आहे. दरम्यान, यापूर्वीचे एलकेजी व यूकेजी मुलांचे ऑनलाइन शिक्षण रद्द करण्यात आले आहे.