राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून एम जी हिरेमठ यांची नियुक्ती झाली आहे.
उद्या मंगळवारी सध्याचे जिल्हाधिकारी डॉ एस बी बोंमनहळळी हे सेवा निवृत्त होणार आहेत. बोंमनहळळी यांनी दोन वर्षे डी सी म्हणून सेवा बजावली आहे
एम जी हिरेमठ हे प्रमोटेड आय ए एस अधिकारी असून ते या अगोदर गदगचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते.हिरेमठ हे मूळचे बेळगाव तालुक्यातील के के कोप्प गावचे रहिवाशी आहेत.
नवीन पोलीस आयुक्त डॉ के त्यागराज यांच्या नंतर हिरेमठ हे नवीन डी सी होणार आहेत.