मान्सूनला सुरुवात झाली की वीज महामंडळाचे नखरेही सुरु होतात. त्यामुळे पावसाळ्यात विजेचा खेळखंडोबा याला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अधिक वीज बिल आकारून पहिलाच नागरिकांना मेटाकुटीला आणलेल्या वीज महामंडळाने आता पुन्हा विजेचा खेळखंडोबा करून त्रास करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी वीज महामंडळ लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी लाईनमन ऑफिसर हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र सध्या शहराबरोबरच ग्रामीण भागाची विजेचा खेळखंडोबाने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र याचे सोयरसुतक महामंडळाला दिसून येत नाही. सध्या पावसाला सुरुवात होऊन केवळ आठ दिवस झाले असून आतापर्यंत दिवसातील पाच ते सहा तास वीजकपात करण्याकडे महामंडळाने लक्ष दिले आहे. त्यामुळे यापुढे शेतातील कामे तसेच भात लागवडची कामे आता रखडणार असल्याचे दिसून येत आहे.
रात्रीच्या वेळी 3फेज वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणल्यानंतर दिवसा वीज कपात करून नागरिकांना हैराण करणे हेच महामंडळाचे लक्ष आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे तरी सुरळीत वीजपुरवठा करावा आणि दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांची छळवणूक थांबवावी अशीच मागणी होत आहे.
बुधवारी सकाळी झाले बिजली गुल
हिंडाल्को येथील २२० के. व्ही. विद्युत केंद्रामध्ये बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बिघाड झाला. यामुळे संपूर्ण बेळगाव शहरातील वीजपुरवठा ठप्प झाला. शहराबरोबरच ग्रामीण भागातही सकाळपासूनच वीज पुरवठा बंद होता. अचानक वीज गेल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. केपीटीसीएल व हेस्कॉम कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. सकाळी साडेदहा पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होईल असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.