कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सुधारित आदेशानुसार आता फक्त महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन आणि 7 दिवसांचे होम काॅरन्टाईन व्हावे लागणार आहे.
त्याचप्रमाणे 11 दिवसांच्या एसओपी नुसार दिल्ली व तामिळनाडू येथील प्रवाशांसाठी असणारे 3 दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन रद्द करण्यात आले आहे.
राज्य सरकारने गेल्या 26 जून रोजी जारी केलेल्या या नव्या आदेशानुसार आता दिल्ली व तामिळनाडूसह इतर सर्व राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना फक्त 14 दिवसांचे होम काॅरन्टाईन व्हावे लागणार आहे. या व्यतिरिक्त गेल्या 15 जून रोजी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे अन्य अटी व नियम पुढील आदेशापर्यंत तसेच कायम असणार आहेत.
या अटी व नियमांमध्ये व्यवसायिक, स्थलांतरित व अन्य खास श्रेणीतील प्रवाशांसाठीचे वेगळे काॅरन्टाईन नियम, सेवा सिंधू पोर्टलमधील सक्तीचे रजिस्ट्रेशन आदींचा समावेश आहे. दरम्यान, काल शनिवारी एका दिवशी राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 900 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.