मला यापुढे कॅबिनेट मंत्री व्हायचे नाही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला राज्याची धुरा सांभाळायची आहे. मी उत्तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्री होण्यास लायक आहे, असा आत्मविश्वास हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांनी व्यक्त केला आहे.
हुक्केरी तालुक्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार यांनी उपरोक्त आत्मविश्वास व्यक्त केला. यापूर्वी मी 8 वेळा कर्नाटक विधानसभेमध्ये निवडून गेलो आहे. राज्यातील कॅबिनेट मंत्री पदही बराचदा भुषविले आहे. त्यामुळे मला आता कॅबिनेट मंत्री पदांमध्ये स्वारस्य नाही. राज्याचा सर्वांगीण विकास साधणे हे माझे ध्येय आहे. मी निश्चितपणे मुख्यमंत्री होईन, फक्त आपल्या सर्वांचा आशीर्वाद हवा, असे प्रतिपादन कत्ती यांनी केले आहे.
गेल्या कित्येक महिन्या पासून मंत्री मंडळात समावेश न झाल्याने कत्ती नाराज आहेत मागील राज्य सभा निवडणुकीत देखील आपले लहान भाऊ रमेश कत्ती यांना राज्य सभेची खासदारकी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते उत्तर कर्नाटकातील आमदारांना जेवण देऊन सरकार वर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना खासदरकीने हुलकावणी दिली होती मात्र मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी कत्ती यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन दिले होते.
आज पुन्हा त्यांनी मुख्यमंत्री होईन असे बोलून दाखवल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्या बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.