कौटूंबिक कलहातून पती आणि पत्नीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बैलहोंगल तालुक्यातील आमटूर गावात घडली आहे.
शिक्षक गुरुनाथ तावरे (40) यांनी मंगळवारी विष प्राशन करून आत्महत्या केली.पतीने आत्महत्या केल्याचे वृत्त कळल्यावर पत्नी मीनाक्षी (32) हिने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली.
पतीने बेळगाव रस्त्यावरील शेतात विष प्राशन करून जीवन संपवले.नंतर लगेचच पत्नीनेही गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.पती गुरुनाथ यांचे मूळ गाव खानापूर तालुक्यातील चिक्कमुनवळ्ळी गावचे असून पत्नी मीनाक्षी हिचे माहेर बेळगाव आहे.
कौटुंबिक वादातून पती आणि पत्नीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ माजली आहे.नंदगड पोलीस स्थानकात त्यांच्या कौटुंबिक वादाबाबत तक्रार दाखल झाली होती.पती,पत्नी आत्महत्येची नोंद बैलहोंगल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.