बेळगावातील हॉटेल सुरू झाली असून मोठी हॉटेल सोमवारपासून सुरू होणार आहेत.हॉटेल सुरू करताना अनेक नियमांचे पालन करण्याची सर्कस देखील हॉटेल मालकांना करावी लागणार आहे.फोर्ट रोडवरील हॉटेल मॅजेस्टिक दोन महिन्यांनी सुरू झाले आहे.या हॉटेलमध्ये ग्राहकांची काळजी हॉटेल मालकांनी योग्य पद्धतीने घेतल्याचे हॉटेलात गेल्यावर दिसून येते.
हॉटेल मेजस्टिकमध्ये दोन टेबलमध्ये अंतर ठेवण्यात आले आहे.तसेच महत्वाचे म्हणजे एका टेबलवर चार व्यक्ती बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.टेबलवर काचेचे पार्टिशन घालण्यात आले असून समोरासमोर बसले किंवा बाजूबाजूला बसले तरी एकाचा संपर्क दुसऱ्याशी येणार नाही याची काळजी घेतली आहे.
या काचेच्या पार्टिशनमुळे व्यक्तींमध्ये अंतर राखले जाते पण त्याचवेळी समोरासमोर बसून एकमेकांशी संवाद साधला जाऊ शकतो.हॉटेलमधील कर्मचारी मास्क घालून हॉटेलमध्ये ग्राहकांना सेवा देत आहेत.हॉटेलच्या प्रवेशद्वारात सॅनिटायझर देखील ठेवण्यात आले आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे अश्यावेळी फोर्ट रोड मधील मॅजेस्टिक हॉटेल अशी काळजी घेत असेल तर शहरातील इतर हॉटेल्सनी देखील काळजी घेणं गरजेच आहे.ज्यावेळी अश्या पद्धतीची काळजी घेतली जाईल त्यावेळी हॉटेल व्यावसायिककरा वरचा विश्वास दृढ होऊन ग्राहक देखील परत हॉटेल कडे वळू लागतील. लोकांच्या मनातील भीती दूर करणे सर्वांनी गरजेचे असून इतर धंदे वाईकांनी असा अवलंब करावा लागेल तरच लोकांच्या मनातील कोरोना दूर होईल