Sunday, December 29, 2024

/

हिंडलगा कारागृहातील कैद्यांचे मृत्यू वाढतेच

 belgaum

दोन-तीन महिन्यांपासून हिंडलगा कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यू झाला आहे. आजारी पणामुळे या तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र ही संख्या वाढतच आहे. रविवारी एका शिक्षा झालेल्या कायद्याचा सिविल हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला आहे. शंकर यमनाप्पा बजंत्री वय 58 राहणार शिरगुप्पी तालुका अथणी असे त्या कायद्याचे नाव आहे.

दरोडा व खून प्रकरणी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. याआधीही दोन ते तीन कायद्यांचा मृत्यू झाला आहे. कैदी शंकर बजंत्री याला 17 मे रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

मात्र उपचाराचा उपयोग न होता त्याचा रविवारी मूर्ती झाला आहे. दहा वर्षांपूर्वी अथणी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात त्यांनी दरोडा व खून केल्याचे उघड झाले होते. या गुन्ह्याखाली त्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. 27 फेब्रुवारी 2010 पासून त्याला मध्यवर्ती हिंडलगा कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर रविवारी उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून दोन ते तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने कैद्यांच्या आरोग्यासाठी प्रयत्न करावेत असे दिसून येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.