Thursday, May 2, 2024

/

भाऊबंदकीच्या वादातून तलवार हल्ला

 belgaum

टिळकवाडी मंगळवार पेठ गवळी गल्ली येथील एका युवकावर भाऊबंदकीचा वादातून तलवार हल्ला झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. या परिसरात घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

स्वतःच्या भावानेच भावावर हल्ला केल्याची घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीकांत बबन गवळी वय 35 राहणार गवळी गल्ली असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर उपचार खाजगी इस्पितळात करण्यात येत आहेत. श्रीकांतवर महेश व श्याम या आपल्या दोन भवानी तलवार हल्ला केल्याचे घडले आहे.

टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. व्हॅक्सीन डेपो परिसरात ही घटना घडली असून श्रीकांत हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र त्यानंतर उपचार होत नसल्याने खाजगी इस्पितळात हलवण्यात आले आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन याची माहिती घेतली आहे. या तिघांमध्ये भाऊबंदकीचा वाद असल्याने हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 belgaum

त्यांच्यावर भादवि 307 सहकलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. टिळकवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.