बघ्यांच्या गर्दीने वाचवला ट्रक चालकाचा जीव

0
2855
 belgaum

अपघात पहायला जमलेल्या गर्दीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमी ट्रक चालकाला वेळेत बाहेर काढून त्याचा जीव वाचवला आहे.

थांबलेल्या टमटम रिक्षावाहू ट्रकला दुसऱ्या मालवाहू ट्रकने  पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही ट्रक मधील दोघे जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री 11:30 च्या दरम्यान पुणे बंगळुरू हायवेवर फ्रुट मार्केट समोर हा अपघात घडला आहे.

 belgaum

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टमटम रिक्षा वाहू करणारा ट्रक रस्त्यावर थांबला होता त्याला दुसऱ्या मालवाहू ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली त्यात थांबलेल्या लॉरी मधील टमटम रिक्षे बाजूला पडले त्याचे थांबलेल्या ट्रकचा ड्रायव्हर हवा चेक करण्यासाठी खाली उतरला होता अपघातात सामानात अडकला होता घटनास्थळी जमलेल्या शेकडो लोकांनी अडकेलेल्या जखमी चालकास बाहेर काढून इस्पितळात रवाना केले.

बेळगाव उत्तर रहदारी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.अपघात पहाण्यासाठी जमलेल्या गर्दीने ढिगाऱ्याखाली अडकेल्या चालकास वेळेत बाहेर काढून त्याचा जीव वाचवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.