मोठ्या आतड्याच्या सुरूवातीला पोकळ शेपटीसारख्या आकाराची एक पिशवी चिकटलेली असते. तिला आंत्रपुच्छ (अपेंडिक्स) असे म्हणतात. ऊतींची अनावश्यक वाढ होऊन आंत्रपुच्छ तयार झालेले असते. अजूनही शास्त्रज्ञांना मानवी शरीरातील अपेंडिक्सचे प्रयोजन काय आहे हे समजलेले नाही. आंत्रपुच्छदाह हा तीव्र स्वरूपाचा आणि दीर्घकालीन टिकणारा आजार स्त्री व पुरूष दोघांमध्ये सारख्याच प्रमाणात आढळतो.
कारणे आणि लक्षणे-पोटाच्या मध्यभागी अचानक दुखायला लागून या विकाराची सुरूवात होते. ही पोटदुखी सूरू होण्यापूर्वी अपचन, अतिसार किंवा शौचास न होणे अशा पोटाच्या तक्रारी रूग्णाला जाणवत राहतात. हळुहळू ही पोटदुखी पोटाच्या उजव्या बाजूच्या खालच्या भागात सरकते, रूग्णाच्या अंगात थोडा तापही येतो. अन्नावरची वासना उडते. तसेच कधी कधी रोग्याला एकदोनदा वांतीही होते. आंत्रपुच्छदाहाच्या दीर्घकालीन
आजारात रूग्णामध्ये उजव्या बाजूची पोटदुखी, मलावरोध, भूक न लागणे, जेवायची इच्छा न होणे, मळमळ ही लक्षणे वरच्यावर दिसू लागतात.
आंत्रपुच्छामध्ये अन्न अडकते व कुजते. या दूषित पदार्थांनी आंत्रपुच्छदाह सुरू होतो. आंत्रपुच्छ लाल होते आणि त्याची आग होऊ लागते. आतड्यामध्ये असलेल्या विशिष्ट जंतुमुळे ंआंत्रपुच्दाला सूज येते.
अपेंडिक्सचा तसा माणसाला काही उपयोग नसल्याने सर्वसाधारणतः शस्त्रक्रियेचा अवलंब करून आंत्रपुच्छ कापून काढले जाते. अगदी तीव्र स्वरूपात आजार असून अपेंडिक्स आतच फुटणार असल्यास किंवा फुटले असल्यास शस्त्रक्रिया करण्यात अर्थ आहे. नाहीतर मध्यम किंवा सौम्य प्रमाणात आंत्रपुच्छदाह असल्यास फक्त आहारनियोजन, निसर्गोपचार व होमिओपॅथीने रूग्ण पूर्ण बरा होतो.
वर वर्णन केल्याप्रमाणे जर पोटात दुखू लागले तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व खाली दिलेले उपचार वैद्यकिय सल्ल्यानुसार करावेत.
निसर्गोपचार- एक चमचाभर मूग उकळत्या पाण्यात घालून त्याचे कढण करावे. दिवसातून ती वेळा थोडे थोडे प्यावे. तीव्र पोटदुखी थांबते. मेथीच्या दाण्याचा चहा फार गुणकारी ठरतो. कारण जास्तीचा श्लेष्मा व आंतड्यातील निरूपयोगी पदार्थ आंत्रपुच्छाशी साठू नयेत यासाठी मेथीचा उपयोग होतो. एक लिटर गार पाण्यात एक चमचा मेथी टाकून हे पाणी मंद आचेवर अर्धा तास उकळवावे. त्यानंतर हा अर्क गाळून गार करून प्यावा. गव्हाचा कोंडा अपचानाच्या तक्रारी दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्यत आहे. भाजून निर्जंतुक केलेला गव्हाचा कोंडा एक भाग आणि सहा भाग गव्हाचे पीठ अशा मिश्रणाच्या दोन चपात्या रोज खाल्ल्या असता या विकाराला आळा बसतो.
होमिओपॅथी- अभिजीत नावाचा एक रूग्ण. यंदा दहावीला होता. त्यालाही वारंवार अपेंडीसायटीसचा त्रास व्हायचा. सोनोग्राफीमध्ये अपेंडीक्सला मध्यम प्रमाणात सूज होती. डॉक्टरनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता. परंतु अभिजीतच्या आईवडिलांना सर्जरी टाळायची होती. त्यांनी याकरिता होमिओपॅथीची मदत घेतली. अभिजीत आता पुर्णपणे बरा आहे
डाॅ सोनाली सरनोबत
9916106896
9964946918