मागील वर्षी आलेल्या महापुरामुळे आणि आता उद्भवलेल्या कोरोना सारख्या महा भयंकर रोगमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र यावर्षी हवामान खात्याने 25 जूनपासून जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के व्ही राजेंद्र यांनी अति दक्षता घेण्याचे निर्देशक संबंधित तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मात्र यासंबंधीतांनी काही तर्क-वितर्क लावले आहेत. ते चुकीचे असून लवकरच महापुराच्या दक्षतेसाठी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे. मानसून 25 जून पासून पडणारा पाऊस धोकादायक असणार आहे, असे हवामान खात्याने वर्तविण्यात आल्याने प्रत्येक गावात दवंडी पेटवून आणि जे कोणी नदीकाठावर अवलंबून असतील त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मदत करा. मागील वर्षी आलेल्या मार्कंड्या नदी परिसरात आणि नाला असणाऱ्या नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा द्या त्यांचे स्थलांतरित करा याच बरोबर बळ्ळारी नाला परिसरात असणाऱ्या नागरिकांबरोबरच जनावरांची काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येक घरात मागील वर्षी झालेल्या महापुरामुळे पाणी घुसले होते आणि हीच धोकादायक घटना यावर्षी घडणार आहे. मागील वर्षी ज्याप्रमाणे कोसळलेला पाऊस यावर्षी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 25 जून पासून हा पाऊस जोरदार होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी आतापासूनच प्रत्येक नदी-नाले यासह इतर भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न करावेत याचबरोबर ज्यांनी कोणी आडमुठेपणा केला तर त्यांच्यावर त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती कारवाई करावी असे आवाहन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के व्ही राजेंद्र यांनी केले आहे.
याचबरोबर मागील वर्षी ज्यांची महापुरामुळे नुकसान झाले आहे त्या घरांना तातडीने मंजुरी देऊन त्यांना निधी द्यावा व त्यांची घरे येत्या महिन्याभरात पूर्ण करावीत असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी देखील या संबंधी दक्षता घेण्याचा आवाहन केले आहे. संपूर्ण जिल्ह्याची दक्षता घेण्यात यावी असे आवाहन के व्ही राजेंद्र यांनी केले आहे. याचबरोबर पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटनेबद्दल आतापासूनच कार्यवाही करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. एकंदरीत या बैठकीत पावसाळ्यापूर्वी संपूर्ण अतिदक्षता विभागात काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहेत.