राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज शनिवार दि. 6 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 378 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या एकूण संख्येने 5 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 5 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शनिवार दि. 6 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आढळून आलेल्या 378 कोरोनाबाधितांमध्ये 8 आंतरराष्ट्रीय, तर 333 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5,213 इतकी झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 1,963 जणांना आत्तापर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 3,134 असून यापैकी 11 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी दोघा जणांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 59 इतकी झाली आहे. यापैकी दोघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.