उपमुख्यमंत्री डॉ अश्वत्थ नारायण यांनी इंटेल या जगप्रसिद्ध चिप निर्मिती करणाऱ्या कंपनीला कर्नाटकात उत्पादन करण्यासाठी निमंत्रित केले आहे.बेळगाव किंवा मंगलोर येथे उत्पादन घटक सुरू करण्यासाठी आवश्यक ते सगळे सहकार्य देण्याचे आश्वासन देखील दिले आहे.
इंटेलच्या इंडिया हेड आणि टॉप एकजीहीक्युटिव्ह यांच्याशी अश्वत्थ नारायण यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
मंगलोर येथे बंदर असून बेळगावहून देखील जवळच गोवा हे बंदर आहे.चिपची निर्यात करण्यासाठी बंदरे उपयुक्त ठरतील.उत्पादन घटक सुरू करण्यासाठी कर्नाटक सरकार आवश्यक ते सहकार्य करेल असे अश्वत्थ नारायण यांनी सांगितले.
यावेळी रॉय यांनी कर्नाटक सरकार कोरोनाची स्थिती चांगल्या तऱ्हेने हाताळत असल्या बद्दल कौतुक करून एक कोटी रुपये मदत दिली.मानस दास यांनी हा मदतीचा धनादेश अश्वत्थ नारायण यांच्याकडे सुपूर्द केला.इंटेलचे अधिकारी देखील यावेळी व्हीडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये सहभागी झाले होते.