कित्तूर राणी चन्नम्मा चौकात विष प्राशन करून आत्महत्त्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.बैलहोंगल तालुक्यातील कुरगुंद या गावचा संजू नायकर असे मृताचे नाव आहे.
गावामध्ये झालेल्या खून प्रकरणात अटक केलेल्या निरपराध व्यक्तींना सोडा म्हणून त्यांनी कित्तूर राणी चन्नम्मा चौकात विष प्राशन केले होते.संजू नायकर याच्या भावाने पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गावातील व्यक्तीचा खून केला होता या प्रकरणी संजूचे भाऊ आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्ती निरपराध आहेत म्हणून त्यांची सुटका करावी अशी मागणी संजू नायकर यांनी केली होती.