Friday, December 27, 2024

/

डीसीसी बँकेत मराठी माणूस लाचार का?

 belgaum

डी सी सी बँक म्हणजे कोणती बँक या बँकेवर संचालक म्हणून निवडून जाण्यासाठी कुणी मतदान केलं पाहिजे याची माहिती बऱ्याच जणांना नसणार मात्र गेल्या दोन दिवसापासून डी सी सी बँक संचालक निवडणुकीसाठी वातावरण तापलं आहे.येत्या आगष्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डी सी सी बँक संचालक पदाची निवडणूक आहे.

या निवडणुकीत कॉंग्रेसचे विद्यमान सदस्य राजू अंकलगी व ग्रामीण च्या आमदारांचे भाऊ रिंगणात असणार आहेत त्यामुळे या निवडणुकीला वेगळं महत्व प्राप्त झाले.बेळगाव तालुक्यातील 75 कृषी पत्तीनं संस्था मतदान करतात या 75 संस्थांना प्रत्येकी एक मतदान करण्याचा अधिकार आहे. डी सी सी बँकेत मतदान केलं जातं कृषी पत्तीनं संस्था ठराव करून कोणत्याही उमेदवारांला मत देऊ शकते अशी प्रक्रिया राबवली जाते.यापूर्वी निंगणगौडा पाटील हे सदस्य म्हणून निवडणूक जात होते मागील वेळी सतीश जारकीहोळी यांच्या पाठिंब्यावर राजू अंकलगी यांनी बाजी मारली होती मात्र यावेळी आमदारांच्या बंधूनी त्यांना आव्हान देण्याचे ठरवले आहे.

बेळगावात तालुक्यातील एकूण 75 कृषी पत्तीनं संस्था पैकी 40 हुन अधिक संस्था मराठी माणसाच्या हातात आहेत मात्र अद्याप मराठी सदस्य निवडून आणता आला नाही.खानापूर तालुक्यात जसा डी सी सी बँकेवर मराठीं सदस्य निवडून जातो तसा बेळगाव तालुक्यात बहुसंख्य मराठी लोकांच्या हातात कृषी पत्तीनं संस्था असून देखील मराठी माणसाला डी सी सी बँकेवर पाठवता आलेलं नाही. बेळगाव तालुक्यातील समिती नेत्यांनी राष्ट्रीय पक्षा पूढे लाचारी पत्करल्याने मराठी माणूस या पदापासून वंचित आहे.

डी सी बँकेच्या राजकारणाचे परिणाम बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर होत असतात त्यामुळे हे पद मिळवण्यासाठी राष्ट्रीय पक्षा कडून मराठी संस्थांना आर्थिक आमिषे दिली जातात नेत्यांना मॅनेज केले जाते मात्र यावेळी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो एखादा सक्षम मराठी उमेदवार उभा केल्यास त्याला यश मिळू शकते मात्र  काही हेकेकोर नेत्यांनी हम करसो कायदा बाजूला ठेऊन राष्ट्रीय पक्षांशी असलेलं साटलोट बंद केलं पाहिजे. विद्यमान आमदारांचा नाद सोडून स्वताची रणनीती आखावी व मराठी माणूस डी सी सी बँकेवर कसा जाईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पी एल डी बँकेच्या निवडणुकी प्रमाणे या निवडणुकीत देखील ग्रामीण भागातील लोक प्रतिनिधींच्या मागे न जाता मराठी सदस्यांला रिंगणात का उतरवू नये अशी मागणी केली जात आहे.

1 COMMENT

  1. कायम राहील पण ,कारण मराठी माणूस इतका सहनशील आहे की ज्या माणसाने समिती विरूद्ध कायम राजकारण केले ,महापौर मराठी होऊ नवे म्हणून मराठी द्वेशी सिद्दंगौडा पाटलाला निवडून आणून बेळगावचा मराठी प्रभाव संपुष्टात आणला
    त्या माणसाला मराठी माणसाने समिती ्चा आमदार म्हणून निवडून आणले मग आपण आणि कशाची अपेक्षा करणार हेच आपल्या नशिबात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.