कोरोना सारख्या महाभयंकर रोगाला न घाबरता आपल्या जीवनातील आनंद लुटण्यासाठी अनेकजण वाटेल तसे वागू लागले आहेत. याला मटका वाले ही अपवाद नाहीत. कोरोना लॉकडाउनच्या काळात मटका खेळणाऱ्यांना उधाण आले आहे. त्यामुळे पोलिसही त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. नुकतीच काकती येथील एका तरुणाकडे मटक्याच्या चिठ्ठ्या आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, मटका गेल्या दोन महिन्यांपासून जोरात सुरू आहेत.
शनिवारी संध्याकाळी बेळगाव तालुक्यातील न्यू वंटमुरी गावाजवळील डोंगरावर मटाकाची चिट्टी लिहित असलेल्या 22 वर्षीय तरूणाला काकती पोलिसांनी अटक केली आहे. काकती गावच्या आंबेडकर गल्ली येथे राहणाऱ्याय हजरतअली अप्पासाब मुलतानी (वय 22) याला अटक करण्यात आली. न्यू वंटमुरी येथील डोंगराळ भागात मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने धाड टाकून अटक केली आहे. या घटनेने मटका घेणार यांचे धाबे दणाणले आहेत.
काकतीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलागी यांच्या नेतृत्वात छापाच्या मुख्य आरोपीला पीएसआय अविनाश, कर्मचारी नागनावर, अरुणा मोकाशी, मारुती पूजारी आणि इतरांच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी धाड टाकतात काही जण फरारी झाले आहेत. त्यांचाही शोध पोलीस घेत आहे.
काकती, होनगा आणि कडोली या आसपासच्या खेड्यांमध्ये मटका जोमात सुरू असतो. त्यामुळे पोलिसांनी या प्रकारांना रोख घालून संबंधितांना अटक करण्याची मागणी होत आहे.