सदाशिवनगर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यावर सार्वजनिक आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने सदाशिवनगर मधील काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला होता.पण जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून कंटेन्मेंट झोन डिनोटिफाय केला आहे.
तेथे सापडलेल्या रुग्णाचे धारावी कनेक्शन आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती.त्यामुळे रुग्णाचे घर असलेला आजूबाजूचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वजनिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने जाहीर केला होता.
कंटेन्मेंट झोन सील करण्यात आल्यामुळे त्या भागातील जनतेला महत्वाच्या कामानिमित्त,व्यवहारानिमित्त बाहेर पडता आले नव्हते.पूर्वेला सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड,पश्चिमेला ओंकार जनरल स्टोअर्स,उत्तरेला हरिद्रा गणपती मंदिर आणि पश्चिमेला नंदिनी मिल्क पार्लर अशी चकबंदी असलेला भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला होता.
गेल्या 28 दिवसात कोरोना पॉजीटिव्ह रुग्णाची नोंद झाली नसल्याने आणि त्या भागात आढळलेली कोरोनाबाधित महिला रुग्ण बरी झाल्याने 13 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून सदाशिवनगर कंटेन्मेंट झोन डिनोटिफाय केला आहे.त्यामुळे आता तेथील व्यवहार आता पूर्वीप्रमाणे सुरळीत होणार आहेत.