माणूस ज्यावेळी संकटात असतो, त्रासात असतो त्याला काही चिंता काळज्या असतात त्यावेळी त्याला आपलं मनोधैर्य वाढवण्यासाठी व मनोरंजनासाठी कोणत्या तरी गोष्टीची गरज असते .लॉक डाऊन कालावधीत सर्वेशानंद संगीत विद्यालयाने ऑनलाइन गायन स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा सर्वेशानंद संगीत विद्यालयाच्या माध्यमातून चंद्रज्योती देसाई यांनी यशस्वी करून दाखवली आहे.
हीअभूतपूर्व स्पर्धा बघून भावगीतांचे गारुड मराठीं मनावर पसरवणारे अरुण दाते यांचे सुपूत्र अतुल दाते यांनी अंतिम फेरीतील परीक्षक म्हणून काम करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
लॉक डाऊन काळात स्पर्धा ज्यावेळी जाहीर झाली अभूतपूर्व असा प्रतिसाद तिला मिळाला.कन्नड मराठी हिंदी सर्व भाषेत ती स्पर्धा घेण्यात आली.गायकांची संख्या प्रचंड असल्याने त्याचे परीक्षण तीन टप्प्यात करण्यात आले.पहिल्या टप्प्यात चंद्रज्योती यांनी परीक्षण करून पुढच्या टप्प्यात स्पर्धकांना निवड करून पाठवले दुसऱ्या टप्प्यात शंकर पाटील आणि किशोर काकडे यांनी परीक्षण केलं.
अतुल दाते परिक्षक म्हणून लाभल्याने त्यांनी अंतिम निकाल लाईव्ह ठेवण्याचे ठरवले आहे रविवार 7 जून रोजी सायंकाळी 6 वाजता zoom app वर अतुल दाते स्पर्धेचा निकाल जाहीर करणार आहेत .त्या नंतर अतुल दाते यांना स्पर्धकांना व रसिकांना प्रश्न विचारून मार्गदर्शन घेता येणार आहे.
बेळगावातील संगीत परंपरेला पुढे नेण्यासाठीअश्याच प्रकारचे उपक्रम राबवले जावेत अशी मागणी रासिकातून वाढली आहे.
हैलो बच्चा पार्टी ?आणि नमस्कार पालकहो, ? आज मी तुम्हाला आपल्या Online गायन स्पर्धेबाबत आणखी एक अतिशय आनंदाची बातमी…
Posted by सर्वेशानंद संगीत विद्यालय on Friday, June 5, 2020
एक गुणी संगीत शिक्षिका म्हणून चंद्रज्योती यांनी आपल्या सुरेल आवाजातून त्यांनी विध्यार्थ्यांना शिबिराच्या माध्यमातून धडे दिलेच आहेत. आता लॉक डाऊनचा सदुपयोग करत बेळगावातील पहिली ऑनलाइन व्हीडिओ गीत गायन स्पर्धेचं यशस्वी आयोजन करत ऑनलाइन संगीत क्षेत्रासाठी केलेलं कार्य देखील कौतुकास्पद आहे.
मुलांना समोर ठेऊन नेहमी मुलांबाबत विचार केल्याने अशी स्पर्धा घ्यावी असा विचार मनात आला मुलांमधील आत्मविश्वास वाढवा त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव कळावे म्हणून व्हीडिओ गीत गायन असे स्वरूप दिलं.फेसबुकवरील पोस्ट बघून अतुल दाते यांनी संपर्क साधला परीक्षण करण्याची जबाबदारी घेतली त्यामुळेच खरी रंगत आली असे चंद्रज्योती यांनी बेळगाव Live शी बोलताना सांगितले.