शेतात रोटरी मारताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने आंबेवाडी येथील युवक ठार झाल्याची गुरुवारी दुपारी घडली आहे.शेतात रोटरी मारताना ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाच्या अंगावर पडल्याने चालक ठार झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर अर्जुन अतवाडकर वय (25) रा गणपत गल्ली बेळगाव असे मयत युवकाचे नाव आहे.
रोटरी मारताना ट्रॅक्टर अंगावर पलटी होऊन गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला उपचारासाठी लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र काहीही उपयोग झाला नाही त्याचा मृत्यू झाला.घटनास्थळी काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी यांनी पहाणी केली.