Sunday, December 22, 2024

/

येळ्ळूर शिवारात धूळ पेरणीची लगबग

 belgaum

येळ्ळूर सुळगा देसुर शिवारात धूळ पेरणीची लगबग सुरू झाली आहे.ज्या शेतकऱ्यांना हुकमी पावसाचा अंदाज असतो तेच शेतकरी धूळ पेरणी करत असतात.

भाताची धूळ पेरणी म्हणजे काय? बेळगाव परिसरातील पाऊस हा हुकुमी आणि सलग पडणारा आहे एकदा पाऊस सुरू झाला आणि हंगाम नाही मिळालं तर…शेतात कुरी चालवणं अवघड जाते म्हणून मशागत केलेल्या काळ्या मातीत धुळीतच पेरणी केली जाते.नंतर पडणारा पाऊस हमखास उगवणीला उपयुक्त ठरतो.Dhulvad perni

शेतकऱ्यांला पुढील कामगत करण्यास सोपे जाते आणि आगास पेरणी झाली असेल तर पावसाचा जोर वाढला भात उगवून वर आलेले असते आणि शेतात पाणी साचेल तसे भात वर वर वाढत जाते अन भात कुजण्याची भीती कमी होते.

येळ्ळूर भागातील शिवारात धुळ पेरणी जोरात सुरू आहे येळ्ळूर बासमती भात जगप्रसिद्ध आहे या शिवरातच धुळवड पेरणी हंगाम जोरात आहे. येळ्ळूर शिवार हे काळ्या मातीची सुपीक जमीन आहे पावसाच्या कितीही लहरीपणा झाला तरी येळ्ळूर शिवार पिकतेच..

कसदार माती वर्षानुवर्षे शेतकऱ्यांचा अनुभव साठवणुकीचे दर्जेदार बियाणे,शेणखताचा केलेला योग्य वापर आणि मुळचाच येळ्ळूर येळ्ळूर शिवारातील जमिनीचा कसदार पणा यामुळे येळ्ळूर शिवरतील शेती सदा हरित ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.