मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शेतीतील मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र काही शेतकऱ्यांना अजूनही पाण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मान्सूनची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
पेरणी तसेच इतर हंगाम साधण्यासाठी शेतकरी घाईगडबड करू लागले आहेत. मात्र पाऊस नसल्याने ही कामे खोळंबली आहेत. अनेक ठिकाणी धूळवाफ पेरणी करून शेतकऱ्यांनी आपली कामे आटपून घेतले आहेत. मात्र त्यासाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे मान्सून कधी एकदा बरसणार याकडेच साऱ्यांचे नजरा लागून राहिल्या आहेत.

सध्या आकाशात ढग दाटून आले आहेत. लवकरच मान्सून होईल अशी आशा साऱ्यांना आहे. मात्र नेमका मान्सून कधी बसणार हे काही सांगता येत नाही. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शेतातील सर्व कामे आटोपून शेतकरी गडबड करू लागले आहेत तर धूळ पेरणी करून अनेकांच्या नजरा आकाशाकडे लागले आहेत.
अनेक ठिकाणी भाजीपाला काढण्यात शेतकरी मग्न आहेत. भाजीपाल्याचे दर गडगडले आहेत तर आणखी काही जिन्नस स्वस्थ झाले आहेत. सध्या काम पूर्ण झाले आहे तर तालुक्यातील इतर भागात भात रोप टाकण्यात आला आहे. मात्र त्यासाठी पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे मान्सून कधी एकदा बरसणार याकडेच साऱ्यांचे नजरा लागून राहिल्या आहेत.




