वादळी वाऱ्याचा फटका वीज पुरवठ्यावर मागील काही दिवसापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मात्र याचा फटका वीज पुरवठ्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. जुनाट झाडांमुळे वारंवार तारांना स्पर्श वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळेच वीजपुरवठा महामंडळाला याचा फटका सहन करावा लागत आहे.
सध्याच्या वातावरणात वादळी वारा आणि पावसाचे बरसने हे कायमचेच आहे. झाडे कोसळून विद्युत खांब व वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळेच विजेच्या समस्येत भर पडत आहे. रस्त्याशेजारी अनेक धोकादायक व जुनाट वृक्ष आहेत. पावसाळ्यापूर्वी हे वृक्ष तोडण्याची गरज निर्माण आहे. मात्र वनविभागाने आणि वीजपुरवठा महामंडळाने संयुक्तरीत्या मोहीम राबवून ही झाडे तोडणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
काही ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र ती पूर्णपणे यशस्वीरीत्या राबवलेली नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. वारंवर झाडांच्या फांद्या तारांवर कोसळून वीज खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने समस्या निर्माण होत आहेत. धोकादायक झाडे वीज वाहिन्यांवर कोसळून तसेच विद्युत खांब व वाहनांचे नुकसान होत असतानाचे चित्र सध्या दिसून येत आहे.
सुरळीत वीजपुरवठा करणे कठीण बनत आहे. अशा परिस्थितीत आता वनविभाग आणि वीजपुरवठा महामंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या सोयीसाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.