रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेने चालत जाणाऱ्या महिलांना कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत तर एक जण जखमी झाली आहे.रविवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान बेळगाव सांबरा रोडवर मुतगे येथे ही घटना घडली आहे.
सविता बाळकृष्ण पाटील वय 46 विद्या भाऊ पाटील वय 48 दोघी राहणार प्रभावती कॉलनी मुतगा अशी या अपघातात मयत झालेल्या महिलांची नावे आहेत तर शांता कृष्णा चौगुले वय 54 रा. प्रभावती कॉलनी मुतगा असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.जखमीवर खाजगी इस्पितळात उपचार सुरु आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कारचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेने वॉकिंग करणाऱ्या महिलांना पाठीमागून जोराची धडक दिली त्यात जागीच दोघी जागीच ठार झाल्या तर एक जण जखमी झाली आहे.कार बेळगावं कडून सांबऱ्या कडे जात होती मुतगा प्रभावती कॉलनी जवळ हा अपघात घडला आहे.
दोन मयत आणि एक जखमी अश्या तिघी महिला माजी सैनिकांच्या पत्नी आहेत. मयत महिला विद्या पाटील यांचे पती केरळ मध्ये सेवा बजावत आहेत त्यांना या घटनेची माहिती देताच ते बेळगावकडे निघाले आहेत.घटनास्थळी मारिहाळ पोलिसांनी भेट देऊन पहाणी केली आहे.