अगसगे गावात जावून क्वारंटाईन मुक्त झालेल्या व्यक्तींना मिठाई वाटलेल्या काँग्रेस आणि भाजप पक्षाच्या पुढाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.
मुंबईहून आलेल्या स्थलांतरित कामगारांना अगसगे गावात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते.त्यांची क्वारंटाईन मुदत संपल्यावर त्यांना सोडण्यात आले.
स्थलांतरित कामगारांना क्वारंटाईन मुक्त केल्याचे वृत्त कळताच काँग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यां आणि कार्यकर्त्यांनी अगसगे येथे जाऊन कामगारांना मिठाई वाटून आनंद व्यक्त करून फोटोही काढून घेतले.ही माहिती भाजपच्या पुढाऱ्यांना कळल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना घेऊन अगसगे गाठले.तेथे त्यांनीही कामगारांना मिठाई वाटली.
काँग्रेस आणि भाजप या दोघांनीही मिठाई वाटल्यामुळे कामगार देखील खुश झाले.पण शनिवारी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी क्वारंटाईन मुक्त केलेल्या कामगारांना ताब्यात घेऊन त्यांना अलगीकरण कक्षात ठेवले आहे.यामुळे मिठाई वाटलेल्या काँग्रेस आणि भाजप पुढाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.