भारतीय जनता पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. तेंव्हा आमदार उमेश कत्ती यांनी 25 असंतुष्ट आमदारांना मेजवानी दिल्याचे जे कांही सांगितले जात आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि भाजप राज्याध्यक्ष नलिनकुमार कुटिल हे परिस्थिती हाताळून योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास बेळगावचे खासदार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी व्यक्त केला.
बेंगलोर येथे उमेश कत्ती यांनी उत्तर कर्नाटकातील 25 असंतुष्ट आमदारांना मेजवानी दिल्यासंदर्भात शुक्रवारी सकाळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री अंगडी यांनी उपरोक्त विश्वास व्यक्त केला. रमेश कत्ती यांना राज्यसभेचे तिकीट देण्याबाबत ते म्हणाले की, उमेश कत्ती यांनी कोणतीही समस्या असल्यास थेट मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बोलले पाहिजे.
त्यासाठी आमदारांना जेवण देणे कितपत योग्य आहे? असे मंत्री सुरेश अंगडी म्हणाले. जी समस्या असेल त्यावर मुख्यमंत्री उपाय शोधून काढून रमेश कत्ती यांना खासदारकीचे तिकीट देण्याचा निर्णय घेतील. त्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा सक्षम आहेत. चार वेळा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद समर्थपणे सांभाळले आहे, असे सांगून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी आमदार उमेश कत्ती यांना अप्रत्यक्ष टोला मारला.