कर्नाटक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 28 मे 2020 दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 75 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,493 इतकी झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या मात्र 139 वर स्थिर आहे.
कर्नाटक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यात आज गुरुवार दि. 28 मे 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत नव्याने 75 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,493 इतकी वाढली आहे.
यापैकी आत्तापर्यंत 809 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 1,635 इतक्या आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 47 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या 28 जणांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील पी- 843 व पी- 845 क्रमांकाच्या रुग्णांचा समावेश आहे.
नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या जिल्ह्यांमध्ये बेंगलोर शहर (7 रुग्ण), यादगिर (7), चिक्कमंगळूर (3), हासन (13), उडपी (27), विजयपुरा (2), चित्रदुर्ग (6), कलबुर्गी (3), मंगळूर (6) आणि रायचूर (1 रुग्ण) या जिल्ह्यांचा समावेश आहे.