कर्नाटक प्रायव्हेट मेडिकल एसट्याब्लिशमेंट ऍक्ट अंतर्गत नोंदणी केलेल्या डॉक्टर,क्लिनिक आणि हॉस्पिटलनी रुग्णसेवा त्वरित सुरू करावी.डॉक्टरांनी आणि क्लिनिकनी त्वरित आपली सेवा सुरू केली नाही तर त्यांचे लायसन्स रद्द करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
कोरोनव्यतिरिक्त अन्य आजारासाठी रुग्णांना उपचार आवश्यक असतात.त्यामुळे अशा रुग्णांना सेवा देऊन उपचार करणे आवश्यक आहे.त्यामुळे त्वरित दवाखाने,हॉस्पिटल सुरू करावीत अन्यथा त्यांचे लायसन्स रद्द केले जाईल असा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश बजावला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही जणांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत.पण आता दवाखाने सुरू करण्यास अनुकूल काळ आहे.आजारी व्यक्तींना उपचार मिळणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.
कोरोना लॉक डाऊनच्या सुरुवातीला डॉक्टरांनी ओपीडी बंद केल्या होत्या त्या नंतर बेळगाव आरोग्य खात्याने खाजगी दवाखान्याना ओपीडी सुरू करा अश्या सूचना दिल्या होत्या तरी देखील अनेक डॉक्टरांनी ओपीडी बंदच ठेवल्या आहेत त्यामुळे डी सी डॉ एस बी बोमनहळळी यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.